विद्या निकेतन हायस्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

चंद्रपूर: श्री जैन सेवा समिती व्दारे संचालित विद्या निकेतन हायस्कुल दादावाडी चंद्रपूर तर्फे शाळेतील शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी शाळेतून शालांत परीक्षेत सर्वात जास्त 95.80 गुण घेऊन उत्तीर्ण झालेली विद्यार्थी कुमारी आदिती विनय सबनिस हिचा सत्कार शाळेतर्फे करण्यात आला. तसेच शाळेतील 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करणा-या विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. यामध्ये यश मारकंडेवार, मनप्रित कौर संधु, तन्वी चिटमलवार, कोमल वाघमारे, मानसी हजारे, अमन जिवणे, पारोमिता घोष, सुजल लोनगाडगे या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

मंचावर श्री जैन सेवा समितीचे अध्यक्ष श्री. राजकुमार रणजितजी पुगलिया, कार्याध्यक्ष अॅड. श्री. महेंद्र मरोठी, सचिव श्री राजेश भंडारी, संचालक श्री राजेंद्र लोढा, ज्यु. कॉलेज प्राचार्य श्री आशिष कुमार झा, हायस्कुल मुख्याध्यापिका राजश्री गोहोकार,सीबीएसई मुख्याध्यापिका सपना पित्तलवार, आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सिमरन सहानी उपस्थित होत्या. मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा शाळेतर्फे स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शाळेतील उत्तीर्ण विद्यार्थी, त्यांचे पालक व शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सौ. विभावरी डोंगरे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here