5G व चिनी कंपन्यांबाबत केंद्राची भूमिका संशयास्पद : खासदार बाळू धानोरकर

चंद्रपूर : देशात लवकरचं 5G इंटरनेट सेवेस प्रारंभ होणार असल्याचे संकेत संचार राज्यमंत्री देवूसिंग चौहान यांनी दिले आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी अतारांकित प्रश्न या संसदीय आयुधांचा वापर करून लोकसभेत 5G बाबत प्रश्न मांडला. यावेळी उत्तर देताना दूरसंचार राज्यमंत्री यांनी स्पष्ट केले की, दूरसंचार विभाग (Department of Telecommunications) आणि भारत सरकारने टेलिकॉम सर्व्हिस प्रदात्यांना 5G चाचण्यांसाठी (5G Trials) परवानगी दिली आहे. ही परवानगी मिळालेल्या ऑपरेटर्समध्ये भारती एअरटेल, रिलायन्स, जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एमटीएनएलचा समावेश आहे.

सध्या 5G ट्रायल्सचा कालावधी 6 महिन्यांचा आहे. यात उपकरणे खरेदी व स्थापनेसाठी 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. दरम्यान खासदार बाळू धानोरकर यांनी सुचविले की, प्रत्येक टेलिकॉम कंपनीला शहरी सेटिंग्ज व्यतिरिक्त ग्रामीण आणि निम-शहरी सेटिंग्जमध्ये ट्रायल्स घ्याव्या लागतील. जेणेकरून देशभरातील 5 जी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल आणि हे नेटवर्क केवळ शहरी भागातच मर्यादित न राहता निम-शहरी आणि ग्रामीण भागातही पोहोचेल. तसेच चिनी कंपन्यांना 5G सेवा पुरविण्याबाबत अनुमती देणार कायाबाबत केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी असे त्यांनी मांडले.

 

काय आहे 5G?

5 जी म्हणजे मोबाइल नेटवर्कची 5 वी पिढी (5th Generation). वेगवान नेटवर्क स्पीड, अखंडित एचडी सर्फिंग, उत्कृष्ट सेवा आणि बरेच काही. भारत सरकारने 5G चाचणीला परवानगी दिली असून लवकरच टेलिकॉम कंपन्यांना स्पेक्ट्रम उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. एअरटेलनेही 5 जी नेटवर्कची चाचणी केली आहे.

वास्तविक, 5 जी तंत्रज्ञान ही सेल्युलर सेवेतील लेटेस्ट टेक्नोलॉजी आहे. याला 4 जी नेटवर्कची पुढील आवृत्ती म्हटले जाऊ शकते. यात वापरकर्त्यांना अधिक नेट स्पीड, कमी लेटेंसी आणि अधिक फ्लेक्सिबिलिटी पहायला मिळेल. आतापर्यंत सेल्युलर तंत्रज्ञान कनेक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रित करत असे, परंतु 5 जी सेल्युलर तंत्रज्ञान एक पाऊल पुढे जाईल आणि क्लायंटला थेट क्लाउडशी कनेक्ट करेल.

देशात 5 जी कधी सुरु होईल?

टेलिकॉम क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते पुढील 6-8 महिन्यांमध्ये भारतात 5 जी सेवा सुरु होऊ शकते. कारण अनेक कंपन्या या वर्षाच्या अखेरपर्यंत 5 लाँच करण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी त्यादृष्टीने पावलं टाकायला सुरुवात केली आहे. तर काही तज्ज्ञांच्या मते डोमेस्टिक टेलिकॉम मार्केट 5G सेवांसाठी तयार होण्यास कमीत कमी 2 वर्ष लागू शकतात.

रिलायन्स जिओने यापूर्वीच 5G संदर्भात आपला मेगाप्लॅन जाहीर केलाय. आता टाटा समूहही या शर्यतीत सामील झालाय.  भारतीय कंपन्यांना प्राधान्य देऊन चिनी कंपन्यांपासून सावध भूमिका घेतली पाहिजे असेही खासदार बाळू धानोरकर यांचे म्हणणे आहे. एकंदरीत केंद्राची चिनी कंपन्यांबाबत भूमिका स्पष्ट होत असल्याने आगामी काळात सुरक्षेचे प्रश्न निर्माण होण्याची चिंता देखील धानोरकर यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here