चंद्रपूर जिल्ह्यातील निर्बंध शिथिल ;आजपासून दुकाने रात्री आठपर्यंत सुरू राहणार

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जारी केले आदेश

चंद्रपूर : कोविड पॉझिटिव्हिटी कमी असणाऱ्या राज्यातील 22 जिल्ह्यांतील निर्बंध राज्य सरकारने शिथिल केले असून त्यामध्ये चंद्रपूरचाही समावेश आहे. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्र श्री अजय गुल्हाने यांनी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत सुधारित आदेश जारी केले असून मंगळवार 3 ऑगस्टपासून जिल्ह्यातील बाजारपेठ खुली ठेवण्याची वेळ रात्री आठपर्यंत वाढविण्यात आली आहे.शनिवारी मात्र दुपारी तीन वाजेपर्यंतच बाजार खुला राहील. रविवारी बाजारपेठ पूर्णत: बंद राहणार आहे. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत निर्बंध माेठ्या प्रमाणात खुले झाले असले तरी सर्व प्रकारची धार्मिक स्थळे बंदच राहणार आहेत.

नियमित वेळेत / नियमितपणे या गोष्टी राहतील सुरू :
1. सर्व अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकाने/ आस्थापना (शॉपींग मॉल्स सह सोमवार ते शुक्रवार रात्री 08.00 वाजेपर्यंत तसेच शनिवारी दुपारी 03.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. सर्व दुकाने व मॉल्स (अत्यावश्यक दुकाने वगळता) रविवारी संपुर्णत: बंद राहतील.

2.सर्व सार्वजनिक उद्याने व क्रिडांगणे व्यायाम, चालने, धावणे, सायकलींग करीता सुरु राहतील.

3. सर्व शासकीय व खाजगी कार्यालये संपुर्ण क्षमतेने सुरु राहतील.

4. ज्या कार्यालयामध्ये यापुर्वी Work From Home पध्दतीने कामकाज सुरु होते ते यानंतरही सुरु राहतील.

5.सर्व कृषी विषयक कामे, बांधकाम, औद्योगीक प्रक्रिया, मालवाहतूक पुर्ण क्षमतेने सुरु राहतील.

6. व्यायामशाळा, योगा केंद्र, केस कर्तनालय, ब्युटीपार्लर, स्पा इ. आस्थापना सोमवार ते शुक्रवार रात्री 08.00 वाजेपर्यंत तसेच शनिवार रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंत टक्के क्षमतेसह वातानुकूलित यंत्राच्या वापराशिवाय सुरु ठेवता येतील. सदर सेवा (आस्थापना) रविवार रोजी संपुर्णत: बंद राहतील.

7.सर्व सिनेमागृहे, नाटयगृहे, मल्टीप्लेक्सेस सिंगलस्क्रीन तसेच मॉल्स यामधील) पुढील आदेशापावेतो बंद राहतील.

8. जिल्हयातील सर्व धार्मीक / प्रार्थनास्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.

9.शाळा व महाविद्यालयाकरीता राज्य शिक्षण / उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे आदेश लागू राहतील.

10. सर्व उपहारगृहे (Restaurants) सोमवार ते शुक्रवार दुपारी 04.00 वाजेपर्यंत 50 टक्के आसन क्षमतेने Dining साठी कोरोना वर्तणुकीविषयक नियमांचे पालन करुन सुरु राहतील. तथापी दुपारी 04.00 ते रात्री 09.00 वाजेपर्यंत केवळ पार्सल / Take Away /घरपोच सुविधा सुरु राहतील. तसेच शनिवार व रविवार Dining साठी पुर्णपणे बंद राहतील व केवळ पार्सल सुविधा / Take Away /घरपोच सुविधा सुरु राहतील.

11. कोणत्याही नागरीकांस रात्री 09.00 ते सकाळी 05.00 या वेळेत बाहेर पडण्यास प्रतिबंध राहतील.

12. गर्दी टाळण्याकरीता वाढदिवस साजरा करणे, राजकीय/सामाजिक/सांस्कृतिक कार्यक्रम निवडणुक, निवडणुक प्रचार, मेळावे, निषेध मोर्चे यावरील निर्बंध पुर्ववत राहतील.

13. सर्व कोरोना वर्तणुक विषयक नियम जसे की, मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे इत्यादी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे प्रत्येक नागरीकांस बंधनकारक असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here