डॉ.गोपालकृष्ण अंदनकर राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

चंद्रपूर: देशातील आयुर्वेदिक चिकित्सा क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कार्य केले अशा प्रमुख व्यक्तींना दिनांक 27 जुलै 2021 ला राज्यपाल माननीय भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई येथे सन्मानित करण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यात मागील अनेक वर्षापासून आयुर्वेदिक चिकित्सा मध्ये मोलाचे योगदान देऊन डॉक्टर गो.वा. अंदनकर उर्फ बबनराव अंदनकर यांना याप्रसंगी जीवनगौरव आरोग्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉक्टर गो.वा. अंदनकर हे आयुर्वेदिक चिकित्सा क्षेत्रातील, राज्यातील जेष्ठ डॉक्टर मध्ये मोडले जाते.मागील साठ वर्षापासून ते या क्षेत्रात कार्य करत असून त्यांनी अनेक समाज उपयोगी कार्य करून रुग्णांना आयुर्वेदिक चिकित्सा चा लाभ मिळवून दिलेला आहे.
डॉक्टर गो.वा. अंदनकर हे सन्मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष व चंद्रपूर येथील विठ्ठल मंदिर देवस्थानाचे अध्यक्ष आहे. त्याचप्रमाणे आयुर्वेदिक व्यास्पीठ, निमा या आयुर्वेदिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संघटनांमध्येही ते कार्यरत आहेत. वयाच्या 85 वर्षातही त्यांचं कार्य आजही युवकांना लाजवेल अशा पद्धतीचे असून त्यांच्या कार्याने अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.
सन्मित्र मंडळाच्या माध्यमातून डॉक्टर गो.वा. अंदनकर यांनी अनेक निशुल्क आरोग्य शिबिरांचे आयोजन करून रुग्णांना आयुर्वेदिक चिकित्सा प्रणालीचा लाभ मिळवून दिला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मित्र मंडळाद्वारे संचालित सन्मित्र सैनिकी विद्यालय, पु.बा. होमिओपॅथिक महाविद्यालय व सन्मित्र कॉन्व्हेंट स्कूल कार्यरत आहे.
डॉक्टर गो.वा. अंदनकर यांना आयुर्वेदिक चिकित्सा क्षेत्रात जीवन गौरव आरोग्य सन्मान पुरस्कार मिळाल्या मुळे, त्यांचे आयुर्वेदिक क्षेत्रात तसेच अन्य वैद्यकीय क्षेत्रातील व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत असून त्यांचे मार्गदर्शन व सहकार्य असेच या पुढे समाज उपयोगी पडावे अशी सर्वांची इच्छा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here