प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी

शेतकरी संघटना तालुका प्रमुख सय्यद शब्बीर जागीरदार यांची मागणी

जिवती: सलग तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून या मुसळधार अतिवृष्टीमुळे जिवती तालुक्यातील नाले, नद्या तुडुंब भरले असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांचा शेतात पाणी शिरल्याने शेतात उभे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. लोकांच्या घरात पाणी शिरल्याने घरातल्या सामानाची नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे. या अतिवृष्टीमुळे घरांचे पडझड झाले, तालुक्यातील शेणगाव येतील उध्दव डोईफोडे या शेतकऱ्याची शेतात उभी असलेली बैलगाडी वाहून गेल्याने बैलगाडी चे नुकसान झाले. त्या शेतकरी चे शेतातले कपाशीचे पीक आडवे पडले, जंगु सोमा सिडाम या आदिवासी शेतकऱ्याचे मका व कपाशीचे पीक जमिनदोस्त झाले असल्याची माहिती शेणगाव चे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष माधवराव डोईफोडे यांनी दिली. तालुक्यात काही ठिकाणी नाले तुडुंब भरल्याने पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे संपर्क तुटला होता. जिवती तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा पिकांचे त्वरित पंचनामे करून पट्टे धारकांना, अतिक्रमण धारकांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी संघटना जिवती तालुकाप्रमुख सय्यद शब्बीर जागीरदार यांनी प्रसिद्धी माध्यमातुन केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here