
चंद्रपूर: आज महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित दादा पवार ह्यांच्या वाढदिवसा निमित्य चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
कोरोना काळात गोरगरीब जनतेची आर्थिक अडचण बघता चंद्रपूर शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांच्या पुढाकारातून चंद्रपूर शहरातील गंजवार्ड येथील गोरगरीब जनतेला रोज उपयोगी पडणारे जीवनावश्यक वस्तूचे वितरण करण्यात आले.
ह्या कार्यक्रमाला जेष्ठ नेते बाबासाहेब वासाडे,विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, शहर महासचिव संभाजी खेवले, प्रवीण जुमडे,केतन जोरगेवार,आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
गंजवार्ड येथील कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूर शहर महासचिव धनंजय दानव ह्यांनी केले.जीवनावश्यक वस्तूचे वितरण करून गरीब जनतेला मदत केल्या बद्दल गंजवार्ड येथील स्थानिक जनतेनी शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड आणि शहर महासचिव धनंजय दानव ह्यांचे आभार मानले.