सततच्या पावसामूळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता योग्य उपायोजना करा – आ. किशोर जोरगेवार

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हात दोन दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत असून आणखी तिन दिवस मूसळधार पाउस राहण्याची शक्यता हवामाण खात्याने वर्तवली आहे. त्यामूळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देत पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता यंत्रणा सुसज्ज करुन उपायोजना कराव्यात अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिल्या आहे.
आज गुरुवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेतली असून चंद्रपूरात सुरु असलेल्या पासवसामूळे उद्भवलेल्या परिस्थिचा आढावा घेतला यावेळी त्यांनी सदर सुचना केल्यात.
चंद्रपूर जिल्ह्यात मागील २ दिवसांपासून सतत पावसाच्या सरी सुरु आहे. हवामान खात्याने येत्या ३ दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. सततच्या पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत होत असून दैनंदिन कार्यात अडचण निर्माण होत आहे. हवामान खात्याच्या पूर्वसूचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना आणि नागरिकांना पूर सदृश्य परिस्थितीचा आणि सतर्कतेचा इशारा देण्यात यावा. पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ नागरिकांना व त्यांच्या पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करता येइल याकरीता उपायोजना करण्यात याव्यात. जुन्या व कच्या इमारतीत वास्तव्यास असलेल्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा व वेळप्रसंगी आवश्यकता भासल्यास त्या खाली करून सदर कुटुंबियांचे तात्पुरत्या स्वरुपात पुनर्वसन करण्यात यावे. पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास विद्युत पुरवठा अखंडित ठेवणे आणि विद्युत सुरक्षतेच्या दृष्टीने वीज वितरण कंपनीला सतर्कतेचा सूचना देण्यात याव्यात. तसेच पाणी पुरवठा विभागाला स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात याव्यात. मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती उद्भवल्यास या संकटाचा सामना करण्याकरिता राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला सक्रीय करून आर्थिक व जीवितहानी टाळण्याकरिता पूर्वसूचना देण्यात यावी. पूर परिस्थितीत जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रमाणित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा. जिल्हा आपत्ती निवारण कक्षाकडे उपलब्ध असलेली साधने सुसज्ज करून मदतकार्यास सज्ज राहण्याकरिता पूर्वसूचना देण्यात यावी. आपत्तीच्या प्रसंगी आपदग्रस्तांना तातडीने मदत देणे व विविध आपत्ती संदर्भात प्रतिबंध, निवारण, पूर्वतयारी, प्रतिसाद, मदत व पुनर्वसन इत्यादी बाबी सुव्यवस्थितपणे हाताळण्यासाठी योग्य ते नियोजन करण्यात यावे अशा सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here