सुपारी घेवून खून करणाऱ्या ४ आरोपितांना २४ तासात दुर्गापुर पोलीसांनी केली अटक

चंद्रपूर: पोलीस स्टेशन दुर्गापुर येथे सरकारतर्फे फिर्यादी नामे पोउपनि किशोर सहारे यांनी रिपोर्ट दिली की, दुर्गापुर वार्ड क्र. ०१ बेताल चौक झोपडपटटी जवळ एक ईसम नामे बंडु कवडु संदोकर वय ५० रा. जलनगर ह.मु. दुर्गापुर वार्ड क्र. ०१ चंद्रपुर याचा मृतदेह पडलेला आहे. सदर मृतकाचा तोंडात दुपटटा कोंबुन असुन गळ्यात सेंट्रीग तार आवळलेला आहे आणि गळ्यावर जखमा सुध्दा दिसुन येत आहे. अशा फिर्यादीच्या लेखी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन दुर्गापुर येथे मर्ग क्र. २९/ २०२१ कलम १७४ जा. फौ. अन्वये नोंद असुन तपासावर आहे.

गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन तात्काळ तपासास सुरवात झाली. पोलीस पथकाने आपली तपास चक्रे फिरवुन गोपनीय माहितीच्या आधारे सदर मर्गच्या चौकशीत निष्पन्न झाले की, मृतक बंडु कवड्डु संदोकार वय ५० रा. जलनगर ह. मु. दुर्गापुर वार्ड क्र. ०१ येथे जागेच्या कारणावरून जमनाबाई शत्रुघन गंजीर वय ५२ रा. बाबुपेठ हिच्या सोबत दिनांक ११/०७/२०२१ रोजी झगडा भांडण झाले होते. त्याचा राग मनात ठेवुन जमनाबाई व तिचा मुलगा उमेश शत्रुघन गंजीर यांनी मिळुन बंडु संदोकर याला जिवानिशी ठार मारण्याचा कट रचला. त्याकरीता जमनाबाईने १ ) करण किसन डोंगरे वय २१ रा. बगलखिडकी चंद्रपुर, २) शंकर हनुमान तुमराम वय २१ रा. महाकाली वार्ड चंद्रपुर यांनी मिळुन बंडु संदोकर याला दारू पाजून त्याचे राहते झोपडीतच बंडु संदोकार याच्या तोंडात दुपटटा कोंबुन त्याचा सेंट्रीगच्या ताराने गळा आवळुन खून केला आहे. असे तपासात निष्पन्न झाल्याने पोलीस उपनिरिक्षक किशोर सहारे यांचे लेखी चौकशी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन दुर्गापुर ला अप.क. १६३/२०२१ ३०२,१२० (ब) भादंवि अन्वये गुन्हा नोंद असुन तपसात आहे.

सदर गुन्हयाबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री अरविंद साळवे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर श्री. शिलवंत नांदेळकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक दुर्गापुर श्री. स्वप्निल धुळे यांचे नेतृत्वात सपोनि. रोशन बावणकर, पोउपनि, प्रविण सोनोने, किशोर सहारे, पोहवा, सुनिल गौरकार, अमोल घोरूडे, पोशि रविंद्र धुर्वे, मनोहर जाधव, संतोष आडे, योगश्वर कौरासे, सुरज लाटकर पोलीस स्टेशन दुर्गापुर यांनी आरोपी नामे १) जमनाबाई शत्रुघन गंजीर वय ५२ रा. बाबुपेठ २) उमेश शत्रुघन गंजीर वय २२ रा. बाबुपेठ चंद्रपुर, ३) करण किसन डोंगरे वय २१ रा. बगलखिडकी चंद्रपुर, ४) शंकर हनुमान तुमराम वय २१ रा. महाकाली वार्ड चंद्रपुर यांना २४ तासात ताब्यात घेवुन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यास मोलाची कामगीरी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here