चला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट

चंद्रपूर,18 जुलै :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 18 जुलै रोजी 84931 झाली आहे. गेल्या 24 तासात 19 नवीन बाधित पुढे असून 17 रुग्ण बरे झाले आहेत .जिल्ह्यात आत्तापर्यंत 83263 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.
कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 135 बाधित उपचार घेत आहे.आतापर्यंत 83263 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 1533 कोरोना बाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here