राज्याचे ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत रविवारी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर दि.10 जुलै: राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि. 11 जुलै 2021 रोजी सकाळी 10:30 वाजता चंद्रपूर औष्णिक वीज केंद्र येथे आगमन. सकाळी 10:30 वाजता महाऔष्णिक वीज केंद्र, कोळसा हाताळणी विभाग येथे रेल्वेद्वारा राख पाठविण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ. सकाळी 11 वाजता 500 मेगावॅट संच क्रमांक 8 व 9 ची पाहणी. सकाळी 11:30 वाजता सभाकक्ष संच 8 व 9 येथे आढावा बैठक. दुपारी 12 वाजता हिराई अतिथीगृह ऊर्जानगर येथे अभ्यागतांसोबत भेट. दुपारी 12:30 ते 1 वाजेपर्यंतचा वेळ राखीव राहील. दुपारी 1 वाजता नागपूरकडे प्रयाण करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here