
एनएसयूआय चे प्रदेश सरचिटणीस कुणाल चहारे यांची पालकमंत्री वडेट्टीवार कडे मागणी
चंद्रपूर: कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर पारिवारिक कार्यक्रमासाठी लागणाऱ्या परवानगी बद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या. आता दुसऱ्या लाटेनंतर पुन्हा पारिवारिक कामासाठी तीच समस्या उद्भवली आहे, लग्नासाठी किंवा इतर सामाजिक कार्यक्रमासाठी कार्यक्रम असणाऱ्या घरच्या व्यक्तीला 8-9 चकरा वेगवेगळ्या 3 कार्यालयात माराव्या लागत होत्या. शेवटी अनेक लोकांकडून याची तक्रार येताच व मुद्दा महत्त्वाचा असल्याने दिनांक 18 जून रोजीचंद्रपूर शहर जिल्हा कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू ) तिवारी यांच्या मार्गदर्शनात एनएसयूआय चे प्रदेश महासचिव कुणाल चहारे यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व यावर चर्चा केली. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी लगेच या विषयावर जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून या विषयावर लवकर निर्णय घेण्याचे आदेश दिलेले आहे.निवेदन देतांना केतन दुरसेलवार, वैभव येरगुडे, मोनू रामटेके आदि उपस्थित होते.