
राष्ट्रवादी कांग्रेसचे शहर अध्यक्ष राजीव कक्कड यांची मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा
चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील लोकसंख्या बघता डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये अंतर्भूत असणाऱ्या व नागपूर हायवेला लागून वडगाव मार्गे नवीन चंद्रपूर च्या दाताळा या परिसराला जोडणारा आणि लाखो नागरिकांना प्रभावित करणारा डी.पी. रोड होण्या संदर्भात व चंद्रपूर शहराची वाढती लोकसंख्या बघता शहराच्या विस्तारासाठी गेल्या अनेक दिवसांपासून चंद्रपूर शहर राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष राजीव कक्कड मनपा आयुक्त चंद्रपूर हयांना भेटून सतत चर्चा करीत होते आणि ह्या संदर्भात अनेक निवेदन सुद्धा देण्यात आले होते,कारण शहराच्या तिन्ही बाजूला वेकोलीच्या खाणी असल्यामुळे आणि वनपरिक्षेत्र असल्यामुळे फक्त हाच एक शहराच्या विस्तारासाठी योग्य मार्ग आहे हे सुद्धा आयुक्त साहेबांच्या निदर्शनात आणून दिले. ह्या रिंग रोड मुळे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या नष्ट होऊ शकते,ह्या दृष्टीने चंद्रपूर च्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये हा रिंग रोड अंतर्भूत पण आहे.
ह्या करीता राष्ट्रवादी कांग्रेसचे राजीव कक्कड ह्यांनी मुंबई येथे नगरविकास राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे ह्यांची भेट घेऊन ह्या चंद्रपूर शहराच्या जिव्हाळ्याच्या विषयावर सविस्तर चर्चा केली. सविस्तर चर्चा झाल्या नंतर ना.प्राजक्त तनपुरे यांनी चंद्रपूरचे मनपा आयुक्त यांना सूचना केल्या की ह्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर स्वतः लक्ष देऊन लवकरात लवकर हा प्रश्न निकाली काढावा व ह्या रिंग रोड साठी लागणारा सर्व निधी समोर येणाऱ्या नवीन बजेट मध्ये उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार साहेब ह्यांच्याशी चर्चा करून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले.