
कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, प्रकाश देवतळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
चंद्रपूर : कोरोना महामारीच्या संकटावर लस हा प्रभावी उपाय आहे. परंतु, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार देशात संथगतीने लसीकरण मोहीम राबवित आहे. तसेच केंद्र सरकारने लसीकरणाची स्वताची जबाबदारी राज्य शासनावर ढकलली. त्यामुळे वेगवेगळ्या किमतीत लस खरेदी करण्याचा आर्थिक बोझाही राज्य शासनावर पडत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशातील सर्व जनतेचे मोफत लसीकरण करावे, अशी मागणी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यासंबंधीचे निवेदन चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.
कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनियाजी गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, खासदार राहुल गांधी यांनी देशातील जनतेला मोफत लस देण्यासंदर्भात केंद्र सरकारला सल्लाही दिला आहे. परंतु, मोदी सरकार आपल्या मनमानी कारभारामुळे त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या कारभाराविरोधात कॉंग्रेस पक्षाने आवाज उठविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने देशात व्यापक प्रमाणात मोफत लसीकरण मोहीम राबवावी, या मागणीसाठी आॅनलाइन अभियान राबविले जात आहे. त्याच अभियानातील टप्पा म्हणून प्रत्येक जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, कुणाल चहारे, राजेश अडूर यांचा समावेश होता.