चला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपङेट

चंद्रपूर,28 मे :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 28 मे रोजी 82197 झाली आहे. गेल्या 24 तासात 187 नवीन बाधित पुढे असून 261 रुग्ण बरे झाले आहेत .जिल्ह्यात आत्तापर्यंत 76989 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.
कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 3778 बाधित उपचार घेत आहे.आतापर्यंत 76989 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 1326 सह एकूण 1430 कोरोना बाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दरम्यान ही वाढती रुग्णसंख्या पाहता सर्वांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे , सुरक्षा बाळगावी आणि आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

1 COMMENT

  1. दारु बन्दी उठ्विली हे चांगलेच झाले
    निदान आता दुकानातच दारु मिळणार अवैधपणे दारु विकुन भरघोस पैसे मिळवणारे आणि दारु दुकानदार यांच्यात संघर्ष होतील .काम करण्यापेक्षा कमी मेहनतीने जास्त पैसे मिळवणे हे
    पुष्कळशा श्रमिक लोकांचा चांगलेच आवडीचे झाले आहे असा सर्वांचाच अनुभव आहे.मागील 5-6 वर्षात मजुरवर्ग मिळेनासा झाला आहे.दारूबंदी सक्तीचे करण्यापेक्षा समाजामधे नैतिक मुल्ये बिम्बवणे जास्त आवश्यक आहे.दारु पिणे हे समाजामधे अवान्छित आणि व्यक्तीचा स्वास्थासाठी नुकसानकारक आहे हे जनमानसात ठसवणे ही काळाची गरज आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here