ऑनलाईन फसवणुकीपासुन सावधान…!

“प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना” नावाखाली बनावट ब्लॉगस्पॉट वेबपेज तयार करून फसवणुकीचा प्रयत्न

चंद्रपूर: कोविड १९ चा प्रादुर्भाव कमी होत नाही तोच सायबर गुन्हयांमध्ये लक्षणीय वाढ होतांनाचे दिसून येत आहे. सोशल मिडीयाद्वारे बनावट ब्लॉगस्पॉट वेबपेज तयार करुन फसवणुकीचा प्रयत्न करून सायबर गुन्हेगारांकडून सर्व सामान्य लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहेत.

प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना २०२१ या मथळयाखाली ब्लॉगस्पॉट वेबपेज तयार करुन त्यात खालील प्रमाणे बेरोजगार लोकांना फेक लिंक पाठवुन त्यामध्ये प्री-रजिस्ट्रेशन करण्यासाठी फॉर्म भरण्याचा आग्रह करण्यात येत आहे. यावरून पोलीस स्टेशन रामनगर येथे कलम ४६८ भादंवि सहकलम ६६ (क), ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here