
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याचे माजी खासदार,ज्येष्ठ नेते नरेशबाबू पुगलिया यांच्या वाढदिवसानिमित्त गुरूवार 20 मे रोजी कोविड-१९ च्या साथीमुळे चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कोरोनावर उपचारासाठी भर्ती असलेल्या रुग्णांना
व त्यांच्या नातेवाईकांना सामाजिक बांधिलकी म्हणून ‘श्री गौरव’ प्रतिष्ठानच्या वतीने भोजन,फळे,मास्क व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगात ज्या विषाणू ने धुमाकूळ घातला आहे, त्या कोविड १९ ला रोखण्यासाठी जगभरातून प्रयत्न केले जात आहेत, या विषाणूचा जास्त प्रसार होऊ नये म्हणून श्री गौरव प्रतिष्ठानचा हा एक छोटासा प्रयत्न म्हणून हा उपक्रम पार पडला.
माजी खासदार पुगलिया यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या बिकट परिस्थितीमुळे वाढदिवस साजरा न करता लोकाभिमुख उपक्रम राबवावे असे आवाहन केले होते. त्या निमित्ताने आम्ही अत्यंय साधेपणाने हा उपक्रम राबवित असल्याचे श्री गौरव चे संस्थापक कुशल पुगलिया यांनी बोलताना सांगितले.
या प्रसंगी श्री गौरव चे संस्थापक नगरसेवक कुशल पुगलिया, करण पुगलिया,देवेंद्र बेले,दुर्गेश चौबे,स्वप्निल तिवारी,मीनल शर्मा, बंटी शनैशचंद्र,अॅड प्रीतिशा शाह, प्रतीक हरणे, प्रतीक तिवारी, चेतन गेडाम, आकाश माशीरकर, कृष्णा यादव, पंकज गुप्ता, जुनैद खान, प्रतीक लोडल्लीवार, बुलबुल मिश्रा आदि उपस्थित होते.