
चंद्रपूर दि. 19, येथील स्मिता जाधव या 37 वर्षीय महिलेच्या गर्भाशयात आठ सें.मी. आकाराचे दोन फेब्राइड गर्भपिशवीसह लॅप्रास्कोपी शस्त्रक्रिया करून यशस्वीपणे काढण्यात आले. कोणतीही चिरफाड न करता सुमारे साडेतीन तास ही शस्त्रक्रिया करण्यात आली. आॅप्टिमस क्लिनीक रामदास पेठ, नागपूर येथील प्रसिद्ध लेप्रोस्कोपी सर्जन सौ. रश्मी वरगंटीवार यांनी मेडीट्रीना येथे ही शस्त्रक्रिया केली. त्या मुळचे चंद्रपूर येथील व आता नागपूर येथे सेवारत अस्थीरोग सर्जन डॉ. अनिरुद्ध वरगंटीवार यांच्या पत्नी आहेत.
पोट उघडून शस्त्रक्रिया न करता लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेद्वारे ओटीपोटीला कमी छेद करावा लागत असल्याने वेदना कमी होतात, रुग्ण लवकर बरा होतो व काही दिवसांतच पूर्वीप्रमाणे कामाला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.