बल्‍लारपूर येथे ऑक्‍सीजन प्‍लॅन्‍ट उभारणार – आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना रूग्‍णांची वाढती संख्‍या चिंताजनक आहे. मृत्‍युचा दर देखील मोठया प्रमाणावर आहे. कोरोना रूग्‍णांना योग्‍य उपचार मिळत नसल्‍यामुळे ते दगावत आहेत. आरोग्‍य व्‍यवस्‍था कोलमडलेली आहे. अशा परिस्‍थीतीत आम्‍ही भारतीय जनता पार्टीच्‍या माध्‍यमातुन प्रशासनाला सहकार्य करण्‍याचा प्रयत्‍न करीत आहोत. व्हेनटीलेटर, ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर, ऑक्‍सीमीटर, रूग्‍णवाहीका आदींच्‍या माध्‍यमातुन आमचे सेवाकार्य अव्‍याहतपणे सुरू आहे. बल्‍लारपूर येथे ऑक्‍सीजन प्‍ल्‍ॉन्‍ट उभारण्‍याबाबत आम्‍ही प्रयत्‍नशील आहोत. नागरिकांनी देखील सुरक्षीतता बाळगावी व खबरदारी घ्‍यावी, असे आवाहन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दिनांक १९ मे रोजी बल्‍लारपूर शहरानजिकच्‍या तालुका क्रिडा संकुलात तयार होणा-या कोविड रूग्‍णालयात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्‍लारपूरसाठी २० ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर, मुलसाठी ०५ ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर, पोंभुर्णासाठी ०५ ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर वितरीत केले. हे ३० ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या आमदार निधीतुन उपलब्‍ध करण्‍यात आले आहे. त्‍याचप्रमाणे माता कन्‍यका सेवा संस्‍था चंद्रपूरतर्फे मायक्रोटेक कंपनीच्‍या माध्‍यमातुन बल्‍लारपूर पंचायत समितीला ६० ऑक्‍सीमीटर वितरीत करण्‍यात आले. यावेळी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, काशी सिंह, मनिष पांडे, निलेश खरबडे, अजय दुबे, समीर केने, अॅड. रणंजय सिंह, मुख्‍याधिकारी विजय सरनाईके, सिध्‍दार्थ मेश्राम, प्रभाकर भोयर यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

याआधीही ना. नितीनजी गडकरी यांच्‍या सहकार्याने चंद्रपूर जिल्‍हा रूग्‍णालयाला १५ एनआयव्‍ही, २ मिनी व्‍हेटीलेटर्स, १५ मोठे व्‍हेटीलेटर्स, चंद्रपूर, मुल, बल्‍लारपूर, पोंभुर्णा साठी ३० ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर उपलब्‍ध केले. आमदार निधीतुन बल्‍लारपूर नगर परिषदेला २ रूग्‍णवाहीका उपलब्‍ध केल्‍या. १०० पीपीई किट, ७० चश्‍मे वितरीत केले. बल्‍लारपूर शहरातील २०० भाजीपाला विक्रेत्‍यांना फेसशिल्‍डसह जीवनावश्‍यक वस्‍तुंच्‍या किट्स वितरीत केल्‍या. कोविड काळात रूग्‍णांना ने-आण करण्‍यासाठी ५ रूग्‍णवाहीकांची सेवा निःशुल्‍क सुरू केली. १५० च्‍या वर ऑटोमेटीक सॅनिटायझर मशीनचे वितरण केले. नुकतेच या मशीनसाठी सॅनिटायझर सुध्‍दा वितरीत केले. मास्‍क व फेसशिल्‍डचे वितरण केले. चंद्रपूर महानगराला १५ व तालुक्‍याच्‍या ग्रामीण भागाला ५ असे २० ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर आ. मुनगंटीवार यांनी वितरीत केले.

बल्‍लारपूर येथे आमदार निधीतुन दोन रूग्‍णवाहीका उपलब्‍ध करताना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आशा वर्कर भगिनींना ऑक्‍सीमीटर उपलब्‍ध करून देण्‍याचे जाहीर केले होते. सदर आश्‍वासनाची पूर्तता आ. मुनगंटीवार यांनी केली आहे. यावेळी बल्‍लारपूर तालुका क्रिडा संकुल येथे तयार होत असलेल्‍या डीसीएचसी रूग्‍णालयाची पाहणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here