चंद्रपूरचे प्रसिद्ध उद्योजक मधुकरराव बांगडे यांचे निधन

चंद्रपूर,17 मे: चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष बबन बांगडे यांचे वडील तथा चंद्रपूर जिल्ह्याचे जेष्ठ उद्योजक श्री वूडन इंडस्ट्रीज आणि बांगडे सॉ मिल गोंडपिपरी चे संचालक श्री मधुकरराव बांगडे यांचे वृद्धापकाळाने रविवार दिनांक १६ मे रोजी रात्री ११-३० वाजता अल्प आजाराने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते.
त्यांच्या मागे २ पुत्र बबन आणि संतोष, २ मुली , पुतणे ,नातवंडे आदि बराच मोठा आप्त परिवार आहे.
सोमवार दिनांक १७ मे रोजी दुपारी १२.३० वाजता त्यांचे राहते घर बांगडे संकुल, गंज वार्ड, चंद्रपूर येथून त्यांची अंत्ययात्रा निघेल आणि शांतिधाम, बिनबा गेट येथै अंतिम संस्कार करण्यात येईल.
त्यांना महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभाग द्वारे चंद्रपुर जिल्ह्याचा उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
सा. चंद्रपूर एक्सप्रेस व तिवारी परिवार च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here