चंद्रपूरच्या आर्य वैश्‍य स्‍नेह मंडळाला आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली रूग्‍णवाहीका भेट

चंद्रपूर: दिनांक १४ मे रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर तालुक्‍याच्‍या ग्रामीण भागासाठी ५ तर चंद्रपूर महानगर क्षेत्रासाठी १५ असे २० ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटरचे वितरण केले. त्‍याचप्रमाणे आर्य वैश्‍य स्‍नेह मंडळ चंद्रपूर या संस्‍थेला एक रूग्‍णवाहीका भेट दिली. यावेळी महापौर सौ. राखी कंचर्लावार, महानगर भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, मनपाचे स्‍थायी समिती सभापती रवि आसवानी, महानगर भाजपाचे सरचिटणीस राजेंद्र गांधी, सुभाष कासनगोट्टूवार, रविंद्र गुरनुले, ब्रिजभुषण पाझारे, प्रकाश धारणे, संजय कंचर्लावार, संदीप आवारी, सचिन कोतपल्‍लीवार, विठ्ठलराव डुकरे, दिनकर सोमलकर आदींची उपस्थिती होती.

याआधीही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्‍हा रूग्‍णालयाला १५ एनआयव्‍ही, २ मिनी व्‍हेटीलेटर्स, १५ मोठे व्‍हेटीलेटर्स, चंद्रपूर, मुल, बल्‍लारपूर, पोंभुर्णा साठी ३० ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर उपलब्‍ध केले. त्‍यांच्‍या आमदार निधीतुन बल्‍लारपूर नगर परिषदेला २ रूग्‍णवाहीका उपलब्‍ध केल्‍या. १०० पीपीई किट, ७० चश्‍मे वितरीत केले. बल्‍लारपूर शहरातील २०० भाजीपाला विक्रेत्‍यांना फेसशिल्‍डसह जीवनावश्‍यक वस्‍तुंच्‍या किट्स वितरीत केल्‍या. कोविड काळात रूग्‍णांना ने-आण करण्‍यासाठी ५ रूग्‍णवाहीकांची सेवा निःशुल्‍क सुरू केली. १५० च्‍या वर ऑटोमेटीक सॅनिटायझर मशीनचे वितरण केले. नुकतेच या मशीनसाठी सॅनिटायझर सुध्‍दा वितरीत केले. मास्‍क व फेसशिल्‍डचे वितरण केले. आता चंद्रपूर महानगराला १५ व तालुक्‍याच्‍या ग्रामीण भागाला ५ असे २० ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर त्‍यांनी वितरीत केले. रूग्‍णसेवा हीच ईश्‍वरसेवा आहे. या पुढील काळातही भारतीय जनता पार्टीच्‍या माध्‍यमातुन आमचे सेवाकार्य असेच सुरू राहणार असल्‍याचे आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.

आर्य वैश्‍य स्‍नेह मंडळ चंद्रपूर या संस्‍थेला त्‍यांनी रूग्‍णवाहीकेची प्रतिकात्‍मक चावी भेट देत रूग्‍णवाहीकेचे लोकार्पण केले. यावेळी राजेश सुरावार, जयंत बोनगीरवार, गिरीश उपगन्‍लावार, वैभव कोतपल्‍लीवार, अजय निलावार, विजय गंपावार, गिरीधर उपगन्‍लावार, डॉ. प्रसन्‍ना मद्दीवार, निरज पडगिलवार, अविनाश उत्‍तरवार यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here