चंद्रपुरकरांसाठी महत्त्वाची बातमी : शुक्रवारी शहरातील पाणी पुरवठा राहणार बंद

चंद्रपूर, ता. १३ : महानगर पालिकेच्या हद्दीत पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी इरई धरणावरुन येणारी पाईपलाईन सिटीपीएसच्या कामामुळे क्षतिग्रस्त झाल्यामुळे शुक्रवारी (ता. १४) चंद्रपूर शहरात पाणीपुरवठा बंद राहील, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. सिटीपीएसच्या कामामुळे पाईपलाईन क्षतिग्रस्त झाल्याने गुरुवारी (ता. १३) इरई धरणावरुन पाणीपुरवठा होऊ शकला नाही. दुरुस्तीचे काम अजुनही प्रगतीपथावर आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता. १४) चंद्रपूर शहरात पाणीपुरवठा बंद राहील. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here