चंद्रपूर मनपाची ५ प्रतिष्ठानांवर कारवाई

चंद्रपूर, ता. ११ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठा दुपारी ११ नंतर बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तरी सुद्धा काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु करून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी (ता. ११) मनपाने चंद्रपूर शहरातील झोन क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या ५ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १० हजार रूपयाचा दंड वसूल केला.

मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशानुसार झोन क्र. एकच्या सहाय्यक आयुक्त शीतल वाकडे, क्षेत्रीय अधिकारी भाऊराव सोनटक्के, मुख्य स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी, लिपिक फारुख अहेमद, विलास नांदणे, तसेच अतिक्रमण पथक यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. कारवाईत शौकत अली, एरिस्टो सेल्स कारपोरेशन, अमोल ट्रेडर्स, रविंद्र फर्निचर, जुनेद खान यांच्याविरुद्ध  दंडात्मक कारवाई करुन एकूण दंड १०,०००/-  वसूल करण्यात आले. यापुढेही नियमांचे उल्लंघन केल्यास प्रसंगी प्रतिष्ठान सील करण्यात येईल, अशी ताकीद मनपाकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here