जनजाती विकास समिती व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चंद्रपूर तर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

चंद्रपूर: संपूर्ण मानवजातीला हतबल करून सोडलेल्या कोविड च्या दुसऱ्या लाटेमुळे सामाजिक व आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. त्यासोबतच आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण वाढलेला आहे. रोज शेकडो रुग्ण रक्त व प्लाझ्मा यासाठी भटकंती करत आहे. काही रुग्णांचे रक्ताविना प्राण पण जात आहे. भारत सरकारने 1 मे पासून १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्याचे ठरविले आहे. एकदा लस घेतली कि २ महिने साधारणत: रक्तदान करता येणार नाही आहे. त्यामुळे या काळात रक्ताचा तुटवडा निर्मान होऊन नये म्हणून त्याअगोदर सर्वांनी रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार आपण पण समाजाचे काही देणं लागतो याच भावनेतून जनजाती विकास समिती, चंद्रपूर व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन स्थानिक डाँ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी चंद्रपूर शहरातील युवा वर्ग व नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. एकूण २८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी प्रामुख्याने ज्येष्ठ विधिज्ञ रवींद्रजी भागवत यांनी भेट दिली. प्रमुख अतिथी म्हणून रोडमल गहलोत यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमित विश्वास, शैलेश दिंडेवार, शुभम दयालवार, ऋषिकेश बनकर, प्रविण गिलबिले तसेच चंद्रपूर जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर चे रक्त संकलन कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here