

चंद्रपूर :कोविड प्रतिबंधक लशीचा चंद्रपुरात उपलब्ध असलेला साठा आज जवळपास संपुष्टात आला आहे. त्यामुळे शुक्रवार 30 एप्रिल ला चंद्रपुरातील मनपा क्षेत्रातील लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार नाही असे चंद्रपूर महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिके तर्फे करण्यात आले आहे.कोरोना लसीकरणाची सुरुवात दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून करण्यात आली. २८ एप्रिल पर्यंत ५० हजाराहून अधिक नागरिकांनी लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला.