नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी यांचे प्रिस्क्रिप्शन असल्याशिवाय सिटीस्कैन करू नये

चंद्रपूर दि. २९, जिल्ह्यात कोरोना तपासणीसाठी आरटीपीसीआर तपासणी केंद्र तसेच सिटीस्कॅन केंद्र व लसीकरण केंद्रावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे, या ठिकाणी संबंधितांनी एकमेकांपासून योग्य अंतर राखत मास्कचा वापर करावा व कोरोनाचे नियम पाळावे असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना बाधितांना सिटी स्कॅन करण्याची आवश्यकता नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सिटीस्कॅन करू नये व त्या ठिकाणी रुग्ण व नातेवाईकांनी विनाकारण गर्दी करू नये. तसेच सिटीस्कॅन करणाऱ्या डॉक्टरांनी देखील नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी यांचे प्रिस्क्रीप्शन असल्याशिवाय केवळ रुग्णांचे विनंती वरून सिटीस्कॅन करू नये, याबाबत संबंधित केंद्रचालकांनी योग्य खबरदारी घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here