
मुंबई : ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे निधन झाले आहे . एकनाथ गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एकनाथ गायकवाड हे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील होते.माजी मंत्री एकनाथ गायकवाड हे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देखील राहले होते.