चंद्रपूरचे माजी नगराध्यक्ष रमेशभाऊ कोतपल्लीवार यांचा आज ’80’ वा वाढदिवस;त्यानिमित्त ज्येष्ठ पत्रकार किशोर पोतनवार यांच्या लेखणीतून…!

महाविदर्भ राज्य संघर्ष समितीच्या वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात रमेश भाऊंचा माझा संबंध आला. मी नुकताच मुंबईहून प्रिंटिंग टेक्नॉलॉजी करून चंद्रपूरला आलो होतो. 1974 ची चंद्रपूर न.प. ची निवडणूक जाहीर झाली होती. त्यानिमित्ताने त्यांच्या कस्तुरबा मार्गावरील कोतपल्लीवार वाड्यात निवडणुकीच्या बैठकी होत होत्या. बाळकृष्णकाका पोटदुखे निवडणूक समितीचे संयोजक होते. त्यांच्या प्रभावाने मला न.प. चे तिकीट मिळाले. मनोहरराव कोतपल्लीवार त्यांचे पिता नगराध्यक्ष पदासाठी उभे होते, ते प्रचंड बहुमताने निवडून आले मी ही निवडून आलो होतो. त्याच सुमारास मला बल्लारपूर पेपर मिल मध्ये सुपरवायझर म्हणून नोकरी लागली होती. सर्व सुखात सुरू होते. अशातच एक मे 1976 रोजी मी, रमेशभाऊ आणि चंद्रकांत ईटणकर नागपूर ला मविस च्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला गेलो होतो. रमेशभाऊ मोवि सचिव केंद्रीय कार्यकारिणीचे कोषाध्यक्ष होते. आम्ही रात्री उशिरा चंद्रपूरला पोहोचलो. दुसरे दिवशी 2 मे 1976 रोजी रविवारी महाकाली यात्रेत पोहोचलो. मी रविवारी अर्धा दिवस ड्युटी करून आलो होतो. महाकाली यात्रेत रात्री मुल्ले यांच्या खून झाला. या खुनाच्या प्रकरणात मला, इटनकरला आणि रमेशभाऊ कोतपल्लीवार यांना गोवण्यात आले. मी तर त्या मुल्ले ला कधी पाहिलेही नव्हते. रमेशभाऊ चा या खून प्रकरणाशी कोणताच संबंध नव्हता. परंतु ते महा विदर्भ राज्य संघर्ष समितीचे नेते होते आणि मविस चा प्रभाव चंद्रपुरात वाढला होता, याच राजकीय कारणास्तव त्यांना या खून प्रकरणी गोवण्यात आले होते. कारण रमेशभाऊ आमदार पदाचे उमेदवार होतो. आम्ही सर्व या प्रकरणात सुखरूप बाहेर पडलो. त्यानंतर रमेशभाऊ भानापेठ वार्डातून निवडून आले आणि चंद्रपुर नगरपरिषदेचे अध्यक्ष बनले. त्यांनी नगरपरिषदेच्या कारभार उत्तम रीतीने चालविला. ते नंतर शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसशी जुळले. आणि या पक्षाची जिल्हाध्यक्ष पद भुषविले. परंतु राजकारणातील बेबंदशाही रमेशभाऊ ला कधी रास आली नाही आणि भ्रष्टाचार कधी सहन झाला नाही. सध्या रमेशभाऊनी राजकारणाशी फारकत घेतली आणि आता ते साईबाबा मंदिरात आपली भक्ती अर्पित करीत आहेत. त्यांच्या ’80’ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे हार्दिक अभिनंदन !
किशोर पोतनवार
संपादक, विलक्षण सत्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here