पीपीई किट घालून खासदार धानोरकरांनी साधला कोविड रुग्णांशी संवाद

चंद्रपूर : वैज्ञानिकांच्या मते कोरोना हा बराच काळ आपल्यासोबत राहणार आहे. या दृष्टीने राज्य सरकार सर्व ताकदीने याचा मुकाबला करत आहे. यासाठी जनतेचे पुर्ण सहकार्य आवश्यक आहे. कोरोना ही लढाई नव्हे तर युद्ध असुन सर्वांनी मिळुन याचा मुकाबला करावा असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.                                         आज चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय येथे खासदार बाळू धानोरकर यांनी भेट दिली. येथील रुग्णांची पाहणी करताना त्यांनी  स्वतः पीपीई किट लावून रुग्णांसोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सर्वानी याचा  मुकाबला करू कुणीही घाबरू नका मी तुमच्या कुटुंबातील सदस्य म्हणून नेहमी सोबत आहे. असा भावनिक दिलासा त्यांना दिला. यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी महाविद्यालयातील सुरु असलेल्या ७५ बेड्स च्या रुग्णांची पाहणी केली. त्यासोबतच ४४ ऑक्सिजन असलेले बेड्स तयार आहे. परंतु वैद्यकीय डॉक्टर व इतर कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्यामुळे सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे खासदार बाळू धानोरकर यांनी तात्काळ शल्य चिकित्सक राठोड यांच्याशी भेटून तसेच संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून तात्काळ ४४ बेड्स सुरु करण्याचे सांगितले. हे उद्या सुरु होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यासोबतच कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णांची प्रकृतीची माहिती मिळण्याकरिता रुग्णालयासमोर मोठी टीव्ही लावून संपूर्ण माहिती त्यावर देण्यात यावी. अशा महत्वपूर्ण सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी अधिष्ठाता हुमणे, वैद्यकीय अधिकारी रामटेके, उपायुक्त महानगरपालिका सरनाईक, शहर कांग्रेस चे अध्यक्ष रामू तिवारी, काँग्रेसचे जेष्ठ नेते विनोद दत्तात्रय, गोपाल अमृतकर, कुणाल चहारे, यश दत्तात्रय यांची उपस्थिती होती.

वाढत्या कोरोना लाटेत मोठ्या प्रमाणात आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. योग्य नियोजन करण्याच्या सूचना खासदारांनी केल्या. यावेळी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली त्यामध्ये २४ तास आरटीपीसीआर, अँटिझन टेस्ट करणारे केंद्र सुरु ठेवावे, त्याकरिता खासगी डॉक्टरांची मदत घ्यावी, चंद्रपूर येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण भरती करण्यात येत आहे. त्यांच्या नातेवाईकाची राहण्याची व जेवणाची मोठी गैरसोय होत आहे. ती त्वरित करावी, अल्प मुदतीचे कंत्राट कडून त्वरित औषध पुरवठा व इतर साहित्यांची खरेदी करावी. अशा लोकहितकारी सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here