कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘जनता कर्फ्यु’चे पालन करा

महापौर व आयुक्तांचे नागरिकांना आवाहन

चंद्रपूर, ता. 20 : महापौर व आयुक्तांचे नागरिकांना आवाहन जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने 21 एप्रिल पासून ‘जनता कर्फ्यु’ लागू केला आहे. शहरातील नागरिकांनी या जनता कर्फ्युचे पालन करून शहरात वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त राजेश मोहिते आणि महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले.

चंद्रपूर जिल्हयांतर्गत सर्व व्यापारी संघ, स्थानिक नागरीक व लोकप्रतिनिधी यांच्या सुचना व सहमतीने सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी कमी करण्यासाठी दिनांक 21 एप्रिल ते 25 एप्रिल, 2021 व दिनांक 28 एप्रिल ते 01 मे 2021 या कालावधीत जनता कर्फ्यु लागू करण्यात आला आहे.  तरी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या जनता कर्फ्युचे पालन करावे, करण नसताना घराबाहेर पडू नका, घरीच रहा सुरक्षित रहा, स्वतः सोबतच आपल्या परिवाराची काळजी घ्या, असे आवाहन मनपा आयुक्त राजेश मोहिते आणि महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले.

21 एप्रिल ते 25 एप्रिल व 28 एप्रिल ते 1 मे दरम्यान या सेवा सुरू राहतील

अ) सर्व दवाखाने व औषधी दुकाने, कृषी केंद्र व पशु खाद्य दुकाने, सर्व शासकीय कार्यालय , बँक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत औद्योगिक आस्थापना (कार्यालयीन दिवशी).

ब) घरपोच सेवासह दुध वितरण, वर्तमान पत्र, एल.पी.जी. गॅस वितरण, पेट्रोल पंप व हॉटेल मधुन Delivery Boy व्दारे घरपोच सेवा सुरु राहील.

क) परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी व त्यांचेसोबत त्यांचे पालक यांना परवानगी राहील. सोबत प्रवेशपत्र बाळगावे.

या सेवा बंद राहणार
किराणा दुकान,भाजीपाला व फळे,सर्व प्रकारच्या व्यापारी आस्थापना / दुकाने उपरोक्त कालावधीत बंद राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here