चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगांचा सीएसआर फंड कोरोनासाठी वापरा 

चंद्रपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यूच्या आकडा वाढत आहे. हि अतिशय चिंतेची बाब आहे. वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे उपलब्ध आरोग्य सुविधा कमी पडत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग आहेत. त्यांच्या मदतीने सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याकरिता कोरोनामध्ये या फंडाच्या वापर करा तसेच प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात  ऑक्सिजन प्लॅन्ट उभारा अशा लोकहितकारी मागण्या खासदार बाळू धानोरकर यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली. या मागणीची दखल तात्काळ घेत पालकमंत्री यांनी तात्काळ जिल्हाधिकाऱयांचा आदेश दिले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री यांनी आढावा बैठक घेतली त्यामध्ये सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. त्यासोबतच काँग्रेसचे शहर अध्यक्ष रामू तिवारी, काँग्रेसचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे यांची देखील उपस्थिती होती.

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने अक्राळ विक्राळ रूप धारण केले असून रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने वेळीच ऑक्सिजन व  व्हेंटिलेटर्स बेडच्या संख्येत वाढ करणे अत्यावश्यक असून रेमडीसीव्हीर इंजेक्शन ची उपलब्धता पण पुरेशा प्रमाणात व्हावी राज्य शासनासोबतच जिल्ह्यातील उद्योग व वेकोलि कडून सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक भक्कम करणे होईचे होणार आहे. त्यासोबतच केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत आहे. परंतु येत्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय मध्ये स्वतंत्र ऑक्सिजन प्लॅन्ट उभारा अशी लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली.

जिल्ह्यातील तालुकास्तरावरील कोरोना रुग्णांना ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण भागातील खासगी रुग्णालये येथेच उपचार व्हावेत जेणेकरून चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालय व इतर रुग्णालयावरील ताण कमी होईल. या सर्व ठिकाणि त्वरित ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड्सची व्यवस्था त्वरित व्हावी. सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवा घेऊन अंगणवाडी सेविका, वैद्यकीय महाविद्यालय येथील विद्यार्थी यांची मदत घ्यावी. जेणेकरून परिस्थिती नियंत्रणात येतील अशा लोकहितकारी सूचना त्यांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here