चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड

अध्यक्ष पदी मजहर अली,उपाध्यक्ष पदी प्रशांत विघ्नेश्वर तर सचिव पदी बाळू रामटेके

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाची सर्वसाधारण सभा,संघाच्या सभागृहात भौतिक अंतर ठेवून रविवार(१८एप्रिल)ला घेण्यात आली. मंचावर सभेचे अध्यक्ष म्हणून संजय तुमराम,प्रशांत विघ्नेश्वर,जितेंद्र मशारकर यांची उपस्थिती होती.
यावेळी सन २०२१-२०२३ या कालावधीसाठी कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
अध्यक्षपदी मजहर अली,उपाध्यक्षपदी प्रशांत विघ्नेश्वर तर सचिव पदी बाळू रामटेके,कोषाध्यक्ष प्रवीण बतकी,संघटन सचिव म्हणून योगेश चिंधालोरे,सह सचिव रोशन वाकडे यांची तर कार्यकारिणी सदस्य पदी गौरव पराते, देवानंद साखरकर,कमलेश सातपुते,रमेश कालेपल्ली व राजेश निचकोल यांची निवड करण्यात आली.
नवनियुक्त कार्यकारिणीचे जेष्ठ पत्रकार सुनील देशपांडे,बाळ हूनगुंद,विजय बनपूरकर,संजय तुमराम,महेंद्र ठेमस्कर,प्रमोद काकडे,आशिष अंबाडे,खुशाल हांडे,जितेंद्र मशारकर आदींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here