
- मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन लावण्याची जोरदार तयारी सुरू केली असून, त्यासाठी सोमवारी दिवसभर बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर, अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात लॉकडाऊन मी म्हणणार नाही, पण कडक निर्बंंध म्हणत नियमावलींची घोषणा केली आहे. त्यामुळे, गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून आता राज्यात उद्या म्हणजेच 14 एप्रिल रोजी रात्री 8 पासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मी नाईलाजाने हे निर्बंध लादत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.