
चंद्रपूर: गरीब रुग्णांना कमी दरात औषधोपचार मिळावा या संकल्पनेतून चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालय येथे अमृत दीनदयाल मेडिकल स्टोर ची सुरुवात करण्यात आली होती. परंतु आज कोरोनाचे संकट उभे ठाकले असतांना या मेडिकल स्टोर मध्ये औशोधांचा तुटवडा असल्याने पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी थेट हे मेडिकल स्टोर गाठले. मेडिकल स्टोर ची संपूर्ण पाहणी करून अहीर यांनी उपलब्ध साठ्याची चौकशी करून कोरोना संबंधित औषोधोपचार येत्या ४ दिवसात उपलब्ध करण्याची तंबी एच एल एल च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.
प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड, बालरोग तज्ञ डॉ. एम जे खान, भाजप महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सर्व गरिबांना बाजारभावापेक्षा निम्म्या किमतीत औषधोपचार मिळावा व सर्वांचे आरोग्य अबाधित राहावे या अपेक्षेतून अमृत दीनदयाल मेडिकल स्टोर ची निर्माण करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील गोर गरीब या योजनेपासून वंचित राहू नये हि सार्थ भावना उराशी बाळगून आपण हे मेडिकल स्टोर चंद्रपुरात आणले होते मात्र औषधोपचार उपलब्ध नसल्याचे चित्र हे मनात सल निर्माण करणारे असल्याचे यावेळी हंसराज अहीर यांनी सांगितले.
कोरोना संबंधी उपयुक्त रेमेडीसीवर, फॅविपीराल, व्हिटॅमिन ए टू झेड, आय व्ही., अँटिबायोटिक्स, सर्जिकल वस्तू या सर्वांची उपलब्धता लवकरात लवकर या मेडिकल स्टोर मध्ये व्हावी यासाठी अहीर यांनी संबंधितांची यावेळी चांगलीच कानउघणी केली. चंद्रपूर शासकीय विद्यालय अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आठवड्यातून एकदा या मेडिकल स्टोर च्या साठ्याचा आढावा घ्यावा असे यावेळी अहीर यांनी सुचविले.
चंद्रपूर जिल्हा हा कोरोनामुक्त व्हावा यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरु असतांना जिल्ह्यात औषध साथ अपुरा पडू नये हे आव्हान समोर असून यावर मात करून जिल्ह्याला सुदृढतेकडे मार्गक्रमण करायचे असल्याने औषधांच्या उपलब्धतेसाठी केंद्रीय स्वास्थ्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी तसेच राज्य सरकारशी संपर्क साधून या मेडिकल स्टोर च्या गलथान कारभाराची तक्रार करून एच एल एल ला त्वरित उपयुक्त औषध साठा उपलब्ध करण्यासाठी विनंती करणार असल्याची ग्वाही यावेळी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. एच एल एल च्या या हलगर्जी धोरणामुळे रक्त तपासणी च्या कराराचा पुनर्विचार करावा असेही यावेळी अहिर अहीर सांगितले. गोर गरीब रुग्णांना कमी दारात औषधांचा साठा या अमृत दीनदयाल मेडिकल स्टोर च्या माध्यमातून पूर्ण होईल असा विश्वास सुद्धा अहीर यांनी व्यक्त केला.