

चंद्रपूर : चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने येथील कस्तूरबा चौकातील पक्ष कार्यालयात कोरोना सहायता कक्ष सुरू करण्यात येणार आहे. या कक्षाचे उद्घाटन रविवारी (ता. ११) दुपारी १२ वाजता कोरोना योद्ध्यांच्या हस्ते केले जाणार आहे. या कार्यक्रमाला शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांच्यासह पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती राहणार आहे.
कोरोना महामारीने आपल्यासमोर फार मोठे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे जास्तच भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अलीकडे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मृत्यूचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार मोठ्या धैर्याने व नियोजनबद्ध पद्धतीने या संकटाशी सामना करीत आहे. संकटकाळात लोकांच्या मदतीला धावून जाणारा काँग्रेस पक्ष या संकटातही सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून मोठ्या प्रमाणात जनजागरण करून कोविड रुग्णांना वैद्यकीय सहायता पुरविण्यासाठी सज्ज आहे. यासाठी कोविडमुक्त गाव व वॉर्ड ही मोहीम राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.