
चंद्रपूर:मधुमेह आणि लठ्ठपणा या संदर्भात शोधकार्य आणि जाणीव जागृती करून अनेकांचे जीवन रक्षक बनलेल्या जग प्रसिद्ध डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे व्याख्यान उद्या ९ एप्रिल, शुक्रवार रोजी वर्चुअल पद्धतीने आयोजित करण्यात आले आहे.
जेसीआय चंद्रपूर गरिमा आणि ईलाईट च्या संयुक्त विद्यमाने हा वेबिनार झूम अॅप वर आयोजित करण्यात आला असून हिंदी आणि मराठी मध्ये यात डॉ. दीक्षित मधुमेही आणि लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींना त्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. डॉ. दीक्षित हे जग प्रसिद्ध वक्ते असून त्यांचा डाएट प्लॅन संजीवनी मानला जातो. या उपक्रमाचा लाभ घेत प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी डॉ. ऋजूता मुंधडा आणि आर्किटेक्ट आनंद मुंधडा यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.