“मिशन अभिनव चंद्रपूर” ची स्थापना

शहरातील पाणी समस्या,वाढीव मालमत्ता कर व इतर गंभीर प्रश्नावर करणार जनआंदोलन

चंद्रपूर: चंद्रपूर शहर हे ऐतिहासीक वारसा लाभलेले असले तरी या शहराला जानकारकर्त्यानी दुर्लक्ष केल्यामुळे विविध गंभीर समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. लोकप्रतिनिधीच जेव्हा समस्यांकडे कानाडोळा करू लागतात,तेव्हा जनतेमधून कुणा जागरूक घटकाला संघटित व्हावेच लागते, याच भुमिकेतून शहरातील वकिल, डॉक्टर, इंजिनिअर्स, माजी पालीका आयुक्त, समाजसेवक, व्यापारी व प्राध्यापक यांच्या पुढाकाराने “मिशन अभिनव चंद्रपूर” हा लोकलढा उभा राहिला असून या माध्यमातून सर्वप्रथम चंद्रपूर शहरातील पाणी समस्या, वाढीव मालमत्ता कर व शहरातील इतर समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती या लोक लढ्याचे संयोजक अॅड. श्री विजय मोगरे, चंद्रपूर यांनी दिली.

“मिशन अभिनव चंद्रपूर” ची सभा दिनांक २६/०३/२०२१ शुक्रवारला झाली. यावेळी महानगरपलिकेचे निवृत्त आयुक्त श्री. जी. एच. घटे साहेब, डॉ. विश्वास झाडे, कर्मचारी आंदोलनाचे नेते अॅड. रमेश पिंपळशेंडे, सामाजिक कार्यकर्ते अॅड. मलक शाकीर, उपप्राचार्य प्रा. संजय बेले, सतनामसिंग मिरधा, अॅड. राम मेंढे, इंजि. स्नेहला आभारे, अँड. भास्कर दिवसे, फकरुद्दीन बोहरा, सुनिल तन्नीरवार, अॅड. इतिका शहा, अॅड. सचिन उमरे, अॅड. विपिन रामटेके, सागर खोब्रागडे, अॅड. विकास धकाते, राजु सारीडेक, सादीक शेख, प्रदीप रूखमांगद प्रामुख्याने उपस्थित होते.
“मिशन अभिनव चंद्रपूर” च्या या पहिल्याच आमसभेत सुमारे ८० शहरप्रेमी सुजाण नागरीक उपस्थित होते. त्यात शिवलाल प्रजापती, अॅड विजय आमटे, अॅड. निलेश दलपेलवार, अॅड. सुनिल पोटदुखे, अॅड. इतिका शहा, अँड. कांचन दाते, अॅड. शालीक घरडे, अॅड. राहुल मेंढे, अॅड. किर्ती बुरडकर, अॅड, प्रिती शिवरकर, अॅड. रूबिना मिझा, बबन बाकरवाले, मनिष खनके, दिनेश शेडमाके, रमेश भांडेकर, किरण पराते, अभिषेक मार्कंडवार, राजेश तामगाडगे, संजय चव्हाण, संदीप मुलकेश्वर, विकास नंदुरकर , सौ. मिनाक्षी गुजरकर, कविता मिरधा, सौ. सविता मसराम, जगदीश हांडे, सुधीर खोब्रागडे, अमोल वासेकर, संघप्रकाश ठमके, ब्रिजेश तामगाडगे, भोजराज ठेमस्कर, गुलाम शेख, व्यंकटराव दुर्योधन, रवि धवन, रोशन शेख, सुलतान सिंग, मुकेश वाळके, आकाशकुमार चन्ने, किसन झाडे, श्रीकांत वैरागडे, बबन वेल्हे, पंकज मलीक, अक्षय लोहकरे, रमेश पारनंदी, विजया बच्चाव, प्रज्योत पुणेकर, शिशुपाल रामटेके व इतर उपस्थित होते.

रामसिंग सोहेल यांनी आभार प्रदर्शन केले. आपले शहर केवळ नावापुरते विकसित असता कामा नये, वास्तव त्यात या शहराला सुंदर आणि आकर्षक बनविणे हे आम नागरिकांचे सुध्दा कर्तव्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. “मिशन अभिनव चंद्रपूर” हा लोकमंच खुला असून तो कुठल्याही जाती धर्म किंवा पक्षाचे प्रतिनिधीत्व करत नाही, तर एक जबाबदार नागरीक म्हणून संपुर्ण शहराचे प्रतिनिधीत्व करतो. त्यामुळे आपले शहर आताच्या येणाऱ्या पिढीला राहण्यायोग्य व्हावे अशी ज्यांची ज्यांची भावना आहे त्या सर्वाचे यात स्वागत असल्याचे आवाहन अॅड. श्री. विजय मोगरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here