भाऊ…! कोरोना है ना..! जरा दूर ही रहना..! 

चंद्रपूर :  कोरोना आजाराचे रुग्ण देशात मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. त्यापासून आपला बचाव करण्यासाठी  धुलिवंदन टाळायला हवे. रंग लावायला आलेल्या मित्रांना प्रांजळपणे ” भाऊ कोरोना है ना..! जरा दूर ही रहना ” सांगायला हवे.खबरदारी म्हणून या वर्षी धूलीवंदनापासून दूर राहण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे.

कोरोनाचा विषाणू दुसऱ्या टप्प्यात भारतात दाखल झाला आहे.विषाणु वाढण्याआधी प्रतिबंधक उपाय करणे सुरु आहे.  सरकारने गाईडलाईन तयार केली आहे. त्याची सर्व नागरीकांनी काळजी घ्यावी. तसेच हस्तांदोलन टाळावे, शिंकतांना, खोकलतांना योग्य काळजी घ्यावी, गर्दी टाळावी, अधिक लोकांनी एकाच ठीकाणी जमा होऊ नये मी या मतदारसंघाचा लोकप्रतिनीधी म्हणुन हे आवाहन करतो यावर्षी सर्व नागरीकांनी होळी, रंग,पाणी खेळणे टाळावे. ढगाळ आणि आर्दता असलेल्या वातावरणात कोरोणाचे विषाणु वाढण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे सर्व नागरीकांना विनंती आहे की, त्यांनी धुलिवंदन टाळावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन खासदार बाळू धानोरकर  यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here