उद्योगपतींकडे लक्ष, शेतक-यांकडे दुर्लक्ष;रामू तिवारी यांचा आरोप

चंद्रपूर : केंद्रातील मोदी सरकार केवळ उद्योगपतींकडे लक्ष देत आहे. देशातील मोठमोठे उद्योग हे खासगी उद्योगपतींना देण्यातच हे सरकार धन्यता मानत आहेत. मात्र, मागील १०० दिवसांपासून कृषी विधेयके रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करीत असलेल्या शेतक-यांकडे या सरकारचे दुर्लक्ष होत आहे. देशातील शेकडो शेतकरी आतापर्यंत शहिद झाले आहेत. परंतु, सरकारला शेतक-यांच्या समस्या सोडविण्यासाठी वेळ नाही. आजघडीला देशातील कामगार, बेरोजगार त्रस्त झाले आहेत. महागाईने सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे. केंद्र सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले असल्याची टीका चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांनी केली.
शेतकरी संघटनांनी २६ मार्चला भारत बंदचे आयोजन केले होते. या आंदोलनाला पाठींबा म्हणून काँग्रेसच्या वतीने संपूर्ण देशात उपोषण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पुढाकारातून येथील कस्तूरबा चौकात शुक्रवार, २६ मार्चला सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेदरम्यान एकदिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी रामू तिवारी बोलत होते.
तीन कृषी कायद्यांविरोधात शेतक-यांनी मागील १०० दिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे. आतापर्यंत ३०० हुन अधिक शेतकरी शहिद झाले आहेत. केंद्र सरकारने आधी चर्चेचा देखावा केला. मात्र, आता या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे. या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने आधीपासूनच पाठींबा दर्शविला आहे. काँगेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार देशभर अनेक आंदोलने करण्यात आली. खासदार राहुल गांधी यांनी पंजाब, हरियाणा या राज्यात ट्रॅक्टर  रॅली काढून सहभाग दर्शविला आहे. काँग्रेसच्या पुढाकारातून सुमारे ६० लाख शेतक-यांच्या सहीचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवून कृषी विधेयके रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव दिवसागणिक वाढत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. कामगार कायद्यातील बदलामुळे कामगार देशोधडीला लागणार आहेत. मात्र, केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहिती यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिली.
आंदोलनात ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, कामगार नेते के. के. सिंग, विनोद दत्तात्रय, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे, महिला काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे, शहर जिल्हाध्यक्ष सुनीता अग्रवाल, नम्रता ठेमस्कर, गोपाल अमृतकर, संतोष लहामगे, प्रशांत दानव, ललिता रेवल्लीवार, कुणाल चहारे, हरीश कोतावार, राजेश अडूर, रोशन पचारे, पवन आगदारी, सोहेल शेख, रुचित दवे, भालचंद्र दानव, मनीष तिवारी, अ‍ॅड. शहा, अश्विनी खोबरागडे, अ‍ॅड. मानी दारला, अनुताई दहागावकर, राजू रेड्डी, प्रसन्ना शिरवार, प्रवीण पड़वेकर,राजू रेवल्लीवार, दुर्गेश कोडाम, सचिन कत्याल, निखिल काछेला, यश दत्तात्रय, मोहन डोंगरे, राहिल कादर, इरफ़ान शेख, संजय रत्नपारखी, राजरतन कोंद्रा, प्रीति शाह, धांडे मॅडम, धोबे ताई, एकता गुरले, बापु अंसारी, काशिफ अली, केतन दुरसेलवार, केशव रामटेके, राजेशसिंग चौव्हान, राजेश वर्मा, मोनू रामटेके, आशीष उराडे, पियूष चहारे, अमोल डेबटवार, नितेश राहुरकडे, पप्पू सिद्दीकी, धरमु तिवारी, रितु दुर्गे, राकेश पिम्पलकर, महेश पुजारी, रवि रेड्डी, विजय धोबे, अजय बल्कि, शीतल काटकर, गौतम चिकाले, मुन्ना चौधरी, उत्तम ठाकरे, जावेद सिद्दीकी,मीनल शर्मा,राजू वासेकर, अश्पाक शेख, सोहेल रजा,आकाश तिवारी, परवीन शेख सय्यद, प्रिया चंदेल, नल्लेश्वर पाझनकर, शीतल काटकर, सुनंदा धोबे, प्रिया चंदेल, वंदना भागवत, मुन्नी मुमताज शेख, गिरडकर, भरती केळझरे यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल  आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here