घरकुल धारकांच्या विविध समस्या घेऊन चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपा आयुक्तांना निवेदन

चंद्रपूर: शहरातील विविध परिसरातील जनतेने महानगरपालिका चंद्रपूर येथे घरकुल साठी अर्ज दाखल केले, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी त्या अर्जाची कुठलीही दखल न घेतल्याने जनता त्रस्त झाली आणि विविध परिसरातील जनतेनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांना भेटून सदर समस्या सांगितल्या. आज दिनांक 15 मार्च ला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड ह्यांच्या नेतृत्वात आज मनपा आयुक्त ह्यांना भेटून निवेदन दिले व जनतेच्या घरकुल संबंधित समस्या मांडल्या व सविस्तर चर्चा केली. आयुक्त मोहिते यांनी समस्येचे निराकरण करण्यात येईल असे आश्वासन या वेळी दिले.
नागरिकांनी दिलेल्या अर्जाचे निराकारण 15 दिवसाच्या आत न झाल्यास मनपा चंद्रपूर समोर शहरातील नागरिकांना घेऊन मोठ्या प्रमाणावर आंदोलन घेण्यात येईल असा इशारा राजीव कक्कड ह्यांनी दिला.
निवेदन सादर करतांना शहर महासचिव धनंजय दानव, संभा खेवले, शहर उपाध्यक्ष निसार शेख, सचिव मुन्ना टेमबुरकर, प्रवीण जुमडे, वैशाली जिभकाटे, सुनीता गोहणे, रेखा गरगेलवार, वंदना कोटपल्लीवार, पूजा रामीडवार, रेश्मा तपासे, प्रतीका कोहपरे, दीपा गरगेलवार, सुलोचना रामीडवार, सविता गरगेलवार, रेखा गरगेलवार, तसेच विविध प्रभागातील महिला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here