चंद्रपूर मनपातर्फे अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई सुरु

चंद्रपूर २२ मार्च – शहर विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करण्यास चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सुरवात झाली असुन आज नागपुर रोड चांदा क्लब समोरील एक मोठे होर्डींग ढाच्यासहीत काढण्यात येऊन होर्डिंगधारकास दंडही ठोठावण्यात आला आहे.
शहरात अनेक होर्डिंग, बॅनर हे अनधिकृतरीत्या लावण्यात आले असून या करीता मनपाकडून कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही अश्या होर्डिंग्जवर कारवाई करण्यासाठी मनपाने कंबर कसली असुन शहरातील अनधिकृत होर्डींग्स होर्डिंगधारकांनी स्वतः हुन काढून घ्याव्या अन्यथा कारवाईस सामोरे जावे असे मनपा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
महानगरपालिका हद्दीत अश्या स्वरूपाचे  डिजिटल पोस्टर्स, जाहिरातीची होर्डिंग, बॅनर  उभारतांना मनपाकडून रीतसर परवानगी घेऊन यासंबंधी आकारण्यात येणारा टॅक्स भरणे आवश्यक असते, मात्र यातील अनेकांनी टॅक्स सुद्धा भरलेला नाही तसेच बऱ्याच ठिकाणी मनपाकडून परवानगीही घेण्यात आलेली नाही. अश्या अनधिकृत बॅनर, होर्डिंग्सची मुळे शहराचे विद्रुपीकरण तर होतच आहे शिवाय मनपाचे आर्थिक नुकसानही होत आहे. काही ठिकाणी धोकादायक इमारतींवर होर्डिंग्ज आहेत. होर्डींग्ज काढण्याची कारवाई आता मनपातर्फे नियमित करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here