

चंद्रपूर, 22 मार्च: कोरोना चे जलद गतीने वाढते रुग्ण लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा काही खाजगी रुग्णालयात कोविड उपचार सेवा सुरू केली आहे. या खाजगी रुग्णालयानी यावेळी आपल्या सेवा अत्यंत नियोजितपणे अद्यावत केल्या असून, त्याचा लाभ गरजूंना होणार आहे. नियमाप्रमाणे यातून रोग्यांना सेवा मिळणार आहेत.
शहरातील ६ खाजगी रुग्णालयात ही सेवा मिळणार आहे. यात रामनगर परिसरातील आस्था रुग्णालय, ९ आयसीयु आणि ११ जनरल असे एकूण २० बेड, नागपूर मार्गावरील पंत रुग्णालयातील १५ बेड तर ३ आयसीयु असे एकूण 18, बुक्कावार रुग्णालय ५ आयसीयु सह ६० बेड, श्वेता हाॅस्पिटलमध्ये १८ बेड, क्राईस्ट हाॅस्पिटलमध्ये ६० बेड आणि गुलवाडे हाॅस्पिटलमध्ये ८० बेडचा समावेश आहे.
मागील कालावधी पेक्षा यावेळी या रुग्णालयाची संख्या कमी असली तरी आयसीयु सह तब्बल २५६ बेड्सची व्यवस्था यातून करण्यात आली आहे. सरकारी नियमानुसार यातून सेवा मिळणार असून, अत्यावश्यक प्रसंगी याचा लाभ कोविड रुग्णाना होणार आहे.