BSNL ग्राहकांनी खोट्या SMS पासुन सावध राहावे

चंद्रपूर, दि. 17 मार्च : के.वाय.सी. अपडेट करण्याच्या नावाखाली बी.एस.एन.एल. ग्राहकांना खोटे एस.एम.एस. प्राप्त होत असून यामध्ये समाजकंटकांडून विशेष नंबर वर के.वाय.सी. विवरण शेअर करण्याविषयी व तसे न केल्यास सीमकार्ड बंद करण्यात येईल असा संदेश देण्यात येत आहे. हे एस.एम.एस. सी.पी.-एस.एम.एस.एफ.एस.टी., अे.डी.-व्ही.आय.आर.आय.एन.एफ., सी.पी.-बी.एल.एम.के.एन.डी., बी.पी.-आय.टी.एल.आय.एन.एन. येथून येत आहेत.

यासंबंधात बीएसएनएलने असे मेसेज पाठविण्यात आले नसल्याचे कळविले असून ग्राहकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. आपल्या केवायसी माहितीचा उपयोग बैंक खात्यातुन पैसे काढण्यासाठी होऊ शकतो व आपली फसवणुक होऊ शकते. तरी ग्राहकांनी अशा संदेशावर लक्ष न देता आपले के.वाय.सी. विवरण कोणासोबत शेयर करु नये, असे दूरसंचार कार्यालयाचे मंडल अभियंता राजेश शेन्डे यांनी कळविलेआहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here