कोरोना नियमांचे पालन न झाल्यास मॅरेज हॉल, लॉन, हॉटेल्स, दुकाने, प्रतिष्ठानांवर दंड व प्रसंगी सील करण्याची होणार कारवाई   

चंद्रपूर १७ मार्च –  लसीकरण आणि नियमांमध्ये मिळालेली शिथिलता यामुळे कोरोनाविषयक बेफिकीर वृत्ती दिसून येत आहे, कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करावी, नियमांचे पालन न करणाऱ्या मॅरेज हॉल, लॉन, हॉटेल्स, दुकाने, प्रतिष्ठानांवर दंड ठोठवावा व प्रसंगी सील करण्याची कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त राजेश मोहिते यांनी दिले आहेत.
शहरात विविध ठिकाणी नाश्ता पॉईंटवर मोठ्या प्रमाणात गर्दी विशेषतः सकाळी आढळुन येते, भाजी विक्रेते, प्रतिष्ठाने येथेही मास्क न घालणे व सोशल डिस्टंसिंगचे पालन न करत असल्याचे आढळुन येते आहे. बेफिकीरीने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मोठ्या प्रमाणात कारवाई करणे गरजेचे झाले आहे. मनपाच्या ७ टीम गठीत करण्यात आल्या असुन त्याद्वारे गर्दीच्या ठिकाणांवर कारवाई करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर शहरातील सार्वजनिक ठिकाणी, मार्केट परिसरात मास्क वापरणे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. टेस्टिंग वाढविण्यावर भर द्यावा. कंटेनमेंट झोन करण्याची गरज पडली तर पोलीस विभागाच्या सहाय्याने करण्याची तयारी ठेवावी. होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्याचे तसेच लसीकरण मोहीमेची गती वाढविण्याचेही निर्देश याप्रसंगी दिले.  कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन शासनाच्या नवीन गाईडलाईन्स आलेल्या आहेत त्यांचे कठोरतेने पालन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत.
याप्रसंगी उपायुक्त श्री. अशोक गरोटे, श्री. विशाल वाघ, सहायक आयुक्त. श्री. धनंजय सरनाईक, शीतल वाकडे, श्री. संतोष कंदेवार, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे, डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. विजया खेरा, डॉ. जयश्री वाडे, डॉ. अश्विनी भारत, डॉ.नयना उत्तरवार, डॉ. योगेश्वरी गाडगे, डॉ. शरयु गावंडे, डॉ. अभिलाषा गावतुरे, डॉ.चंद्रागडे, नरेंद्र जनबंधु,सर्व स्वच्छता निरीक्षक व आरोग्य कर्मचारी उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here