चंद्रपूर मनपा अग्निशमन विभागातर्फे अतिरिक्त संपर्क क्रमांक जाहीर  

चंद्रपूर १५ मार्च –  चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरात आग लागण्याची आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास १०१ या संपर्क क्रमांकाप्रमाणे ८९७५९९४२७७,९८२३१०७१०१ हे दोन मोबाइल क्रमांक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे उपलब्ध करण्यात आले आहे. या संपर्क क्रमांकांच्या सहाय्याने तातडीने दुर्घटनास्थळाची माहिती देणे आणि समन्वय साधने सोपे ठरणार आहे.
शहरात विविध प्रकारच्या आपत्कालीन प्रसंगाना तोंड देण्यासाठी पालिकेची अग्निशमन यंत्रणा कार्यरत आहे. मागील काही काळापासुन शहरात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आगीच्या घटनेची माहिती देण्यास १०१ हाच क्रमांक आतापर्यंत उपलब्ध होता. एकच क्रमांक उपलब्ध असल्याने कॉल करतांना अडचण निर्माण होण्याची शक्यता असते.
क्वचित प्रसंगी १०१ हा आपत्कालीन क्रमांकात बिघाड आल्यास नागरीकांना तात्काळ संपर्क करता येऊन घटनेची माहिती देणे सोपे व्हावे यादृष्टीने स्थायी समिति सभापती श्री. रवि आसवानी यांनी तात्काळ दोन आपत्कालीन नंबरची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ८९७५९९४२७७,९८२३१०७१०१ हे दोन मोबाइल क्रमांक उपलब्ध करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here