चंद्रपूरचे माजी आमदार एड. एकनाथराव साळवे यांचे निधन

चंद्रपूर:चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार व ज्येष्ठ विधिज्ञ एकनाथरावजी साळवे यांचे आज 13 मार्च 2021 रोजी दुपारी 1.20 मिनिटाला वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले.

ध्‍येयवादी समाजसेवक हरपला – आ. सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया
 
माजी आमदार अॅड. एकनाथराव साळवे यांच्‍या निधनाने ध्‍येयवादी समाजसेवक हरपल्‍याची प्रतिक्रिया माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे.
लोकप्रतिनिधी या नात्‍याने एकनाथराव साळवे यांनी जनतेच्‍या विविध प्रश्‍नांची सोडवणूक करत या जिल्‍हयाच्‍या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी यांच्‍या विचारांवर त्‍यांची निस्‍सीम श्रध्‍दा होती. राजकीय मतभेदाच्‍या भिंती बाजूला सारून त्‍यांनी नेहमीच सर्व पक्षातील कार्यकर्त्‍यांवर व नेत्‍यांवर स्‍नेह केला व त्‍या माध्‍यमातुन माणसे जोडण्‍याची किमया साधली. त्‍यांच्‍या या गुणवैशिष्‍टयाच्‍या बळावर मोठा लोकसंग्रह त्‍यांनी निर्माण केला. दुरध्‍वनी व पत्रव्‍यवहाराच्‍या माध्‍यमातुन मला नेहमी त्‍यांची कौतुकाची थाप मिळायची. तत्‍वनिष्‍ठता हे एकनाथराव साळवे यांचे बलस्‍थान होते. त्‍यांच्‍या निधनाने चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्‍दात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्‍या शोकभावना व्‍यक्‍त केल्‍या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here