महाशिवरात्रीनिमित्त डेरा आंदोलनात मुस्लिम बांधवांनी केले फराळ वाटप

चंद्रपूर :वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील 500 च्या जवळपास कोरोना योध्या कंत्राटी कामगारांना ७ महिन्यांचा थकीत पगार व किमान वेतन देण्यात यावे या मागण्यांसाठी मागील ३२ दिवसांपासून सुरू असलेल्या डेरा आंदोलनामध्ये चंद्रपूर जिल्हा व शहर एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी आज महाशिवरात्री निमित्त फराळ वाटप करून एक आदर्श उपक्रम राबविला.संपूर्ण देशामध्ये धार्मिक व सामाजिक मतभेद उफाळून आल्यासारखी परिस्थिती असतांना आज एमआयएम च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अनेक मुस्लीम बांधवांना सोबत घेऊन दुपारी २ वाजताचे सुमारास डेरा आंदोलनाचे मंडपात महाशिवरात्री निमित्त सर्व कामगारांना फराळ व केळांचे वाटप केले. एमआयएम चे जिल्हाध्यक्ष नाहीद हुसैन,चंद्रपूर शहर अध्यक्ष अजहर शेख,युवा अध्यक्ष शाहिद शेख, समीर मिर्झा, साजिद शेख, अवेश कुरेशी, सोहेल शेख,असलम शेख, वसीम पॉशा, तौसिफ खान, फरहान शेख, इर्शाद शेख, रजत खोब्रागडे, सुहास भैरे,अल्फाज खान, सलीम शेख,पिटुं बागवान,जावेद कुरेशी,वसिम कुरेशी,साजीद कुरेशी या सर्व पदाधिकाऱ्यांनी फराळ वाटपाच्या कार्यक्रमात योगदान दिले. सामाजिक बंधुभाव जोपासणाऱ्या एमआयएम च्या या उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

संभाजी ब्रिगेड व इको-प्रो चा डेरा आंदोलनाला पाठिंबा

संभाजी ब्रिगेड चे विभागीय अध्यक्ष विनोद थेरे , केंद्रीय निरीक्षक चंद्रकांत वैद्य, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. सचिन बोधाणे, जिल्हा सचिव गजानन नागपुरे ,महानगर अध्यक्ष अॅड. मनिष काळे, सचिव प्रशांत लांडे, अक्षय लोणारे ,कवडूभाऊ काळे तसेच
इको- प्रो संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बंडू धोत्रे पदाधिकारी नितीन रामटेके, कुणाल देवगिरकर यांच्या शिष्टमंडळाने डेरा आंदोलनाला भेट देऊन कामगारांच्या उपस्थितीत जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांना समर्थनाचे पत्र दिले. पीडित कामगार हाक देतील तेंव्हा कामगारांसाठी जनआंदोलन उभे करून त्यामध्ये सहभागी होण्याची घोषणा सुद्धा यावेळी संभाजी ब्रिगेड व इको-प्रो च्या पदाधिकाऱ्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here