सावित्रीच्या लेकींचा नमस्ते चांदा फाउंडेशन तर्फे सत्कार

चंद्रपूर : कधी कधी अतिशय महत्त्वाचे आणि आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक असलेल्या काही गोष्टी करणारे लोक आपल्या जवळ असूनही आपल्याला अपरिचित असतात. परंतु, ते आपलं काम खूप निष्ठेने करत असतात. असाच एक महत्त्वाचा घटक म्हणजे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी यांचे आपल्या आयुष्यात स्थान अद्वितीय आहे. त्याच मुळे या त्यांच्या कामाला सलाम म्हणून, नमस्ते चांदा फाउंडेशने आज (८ मार्च) ला महिला  दिनाचे औचित्य साधून महिला सफाई कामगारांचा सत्कार केला.
हा नमस्ते चांदा फाउंडेशन तर्फे या अद्वितीय आणि अपरिचित कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा छोटासा  प्रयत्न होता.

सावित्री माईंनी अशा उपेक्षित घटकांसाठी आपले आयुष्य दिले. समाजातील उपेक्षित घटक म्हणून समजले जाणारे सफाई कामगार, खरतर देशसेवेतील काही अग्रगण्य घटकांपैकी एक आहे. या घटकांकडे बघण्याच्या दृष्टिकोन देखील बदलण्याची गरज आहे.

महिला दिना निमित्त चंद्रपूर शहरातील नमस्ते चांदा फाउंडेशनच्या युवकांनी सेवेत रुजू असलेल्या सफाई कामगारांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये मुख्य समस्या म्हणजे त्यांना हात मोजे व इतर साहित्यांची गरज आहे. ही साहित्य लवकरच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही या युवकांनी त्यांना दिली. तसेच त्यांच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून उपहार म्हणून त्यांना काही भेटवस्तू दिल्या.
सावित्री बाईंचे विचार अंगीकारून सर्वानी एकत्र येऊन येत्या काळात अशा घटकांसोबत जीवनाच्या काही वेळ घालून त्यांच्या समस्या एकूण त्या मार्गी लावण्याच्या प्रयत्न करण्याची गरज आहे.
नमस्ते चांदा फाउंडेशन चा हा उपक्रम सगळ्यांसाठी प्रेरणादायी असा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here