कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा

  • चंद्रपूर, दि. 25 फेब्रुवारी : कोरोना पॉझेटिव्ह अहवाल येणाऱ्या बाधीत रूग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त नागरिकांचा शोध घेवून त्यांच्या तपासण्या करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज कोरोना टास्क समितीच्या आढावा बैठकीत दिले.
    जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वीस कलमी सभागृहात आयोजित कोरोना टास्क समितीच्या बैठकीला अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, जिल्हा आरोग्य अधिकारी, राजकुमार गहलोत, प्रभारी वैद्यकीय अधिष्ठाता बंडू रामटेके, म.न.पा.चे वैद्यकीय अधिकारी अविष्कार खंडारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, लसीकरण अधिकारी डॉ. संदिप गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते.
    जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की ज्या भागात कोरोना बाधीत रूग्णवाढीचा दर जास्त प्रमाणात आहे, त्या भागात विशेष चमुद्वारे सर्वेक्षण करून कोरोना सदृष लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांच्या तपासण्या वाढविल्यास कोरोना फैलाव रोखता येईल व वेळीच रूग्णाची ओळख पटल्याने औषधोपचाराद्वारे कोरोना मृत्यूचा संभाव्य धोकादेखील टाळता येईल. दुसरा सिरो सर्व्हे तातडीने सुरू करण्याचे निर्देश देतांना सामान्य रूग्णालयाने कोरोना प्रश्नावर गंभीर होण्याची आवश्यकता असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
    दि. 1 मार्च पासून 45 वर्षावरील व्याधीग्रस्त व 60 वर्षावरील सर्व नागरिकांचे लसिकरण करण्याचे शासनाचे निर्देश असून याबाबत आरोग्य यंत्रणेने पुर्ण तयारी करून ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
    बैठकीला आरोग्य व प्रशासकीय यंत्रणेचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here