विदर्भात गारपीटसह मुसळधार पावसाची शक्यता,हवामान खात्याकडून इशारा

चंद्रपूर : पूर्व विदर्भातील पुढचे दोन दिवस पावसाचे आणि गारपिटीचे राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. १६ आणि १७ फेब्रुवारीला वातावरणातील हा संभाव्य बदल लक्षात घेता, नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना सावधगिरीच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
नागपूर हवामान प्रादेशिक कार्यालयाने कळविल्यानुसार, विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पुढचे ४८ तास अवकाळी पावसाचे राहणार आहेत. नागपूरसह भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ही शक्यता वर्तविण्यात आली आहे. १६ तारखेला एक-दोन ठिकाणी विजांसह पाऊस येण्याची शक्यता आहे. परंतु १७ तारखेला या जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी विजांसह गारपीट, पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विशेषत: चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी गारपिटीचा आणि पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here