
चंद्रपूर, ११ फेब्रुवारी : डॉ. दिपक म्हैसेकर (भा.प्र.से.), सल्लागार , मुख्यमंत्री, महाराष्ट्र व चंद्रपूर चे माजी जिल्हाधिकारी तसेच पूर्व अध्यक्ष, नागपूर सुधार प्रण्यास आणि पूर्व विभागीय आयुक्त, पुणे यांनी आज स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथील नाणे संग्रहालयाला (Coin Gallery) श्रीमती विद्युत वरखेडे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या सोबत भेट दिली.
यावेळी इंटैक चंद्रपूर अध्याय चे सहसंयोजक प्रविण निखारे आणि सचिन जहागिरदार यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. म्हैसेकर यांचे स्वागत केले.
उल्लेखनीय बाब म्हणजे ज्यावेळी डॉ. म्हैसेकर चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते त्याचवेळी त्यांच्याच संकल्पनेतून सदर नाणे संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली होती.
नाणे संग्रहालयातील दुर्मिळ नाण्यांचे प्रदर्शनीची भरभरून प्रशंसा करित त्यांनी अशोक सिंह ठाकुर यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी लता मंगेशकर आर्ट गॅलरीतील विविध ऐतिहासिक प्रतिमांचे अवलोकन केले.